काश्मिरी पंडित आणि तेथील सामान्य डोग्रा हिंदू यात भेद करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा ओवैसी यांचा कुटील डाव !
ओवैसी यांच्या धर्मबांधवांनी केलेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराचे आजही अनेक हिंदू साक्षीदार आहेत. त्यामुळे किती हिंदूंना मारले हे सांगणारे ओवैसी स्वतःच्या धर्मबांधवांवर कारवाईची मागणी कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

मुंबई – काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी देऊ शकतो. तथापि डोग्रा भागातील जे १ सहस्र ५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी हिंदू नव्हते, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार ?, अशी गरळओक एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) प्रमुख आणि खासदार असद्दुद्दीन ओवैसी यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
Kashmir Files मूवी पर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी ने दी प्रतिक्रिया pic.twitter.com/WHKtrLrP2F
— NDTV India (@ndtvindia) March 16, 2022
ते पुढे म्हणाले की,
१. देशात मुसलमानांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे ? (काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित करणारे, सहस्रो हिंदूंची हत्या करणारे, हिंदु महिलांवर बलात्कार करणारे सर्व जण औवेसी यांचे धर्मबांधवच होते ! त्यांनी हिंदुद्वेषातून हे कृत्य केले. आता केवळ हे सत्य चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आले आहे. मग हा मुसलमानद्वेष कसा काय ? आणि १५ मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ? – संपादक)
२. सामाजिक माध्यमांवर असे किती व्हिहिओ सध्या दिसत आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुसलमानांच्या विरोधात भाषण करत आहेत. असे का होत आहे ? (हा प्रश्न ओवैसी यांनी हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या त्यांच्या धर्मबांधवांनाच विचारावा ! – संपादक)
३. मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात त्यांनी किती काश्मिरी हिंदूंना परत काश्मीरमध्ये पाठवले, हेही सांगा. (ओवैसी यांच्या धर्मबांधवांमुळे काश्मिरी हिंदूंसाठी काश्मीर आजही असुरक्षितच आहे, याविषयी ओवैसी यांनी प्रथम बोलावे ! काश्मीरमध्ये हिंदूंच्या सुरक्षेची हमी ओवैसी देणार का ? – संपादक)
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !