भरतपूर (राजस्थान) येथे नव्या रस्त्याची अवघ्या ५ दिवसांत दुर्दशा !

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि स्थानिक आमदार यांनी भ्रष्टाचार केल्याचा स्थानिकांचा आरोप

काँग्रेसच्या राज्यात जनतेचा विकास करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करून घेणारे काँग्रेसचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी !

प्रातिनिधिक छयाचित्र

भरतपूर (राजस्थान) – राज्यातील काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री भजन लाल जाटव यांच्या जिल्ह्यात ६० लाख रुपये व्यय (खर्च) करून बांधण्यात आलेल्या रस्त्याची अवघ्या ५ दिवसांत दुर्दशा झाली आहे. यानंतर स्थानिक लोकांनी जाटव यांच्यासह स्थानिक आमदार वाजिब अली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

गुलपाडा ते काबान का वास या भागापर्यंत बांधण्यात आलेल्या या मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले होते; मात्र आता त्या मार्गावरून चालणेही दुरापास्त झाले आहे. मार्गावरील डांबर निघाले आहे. या मार्गाची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आली आहेत. लोकांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.