महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळीयुद्ध चालू आहे ! – राजू शेट्टी


सातारा, १६ मार्च (वार्ता.) – रस्त्यावर उतरून आंदोलने करणे, चळवळ करणे हा आमचा उद्योग-व्यवसाय नाही. महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळीयुद्ध चालू आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, भाजपमध्ये शेतकर्‍यांना बुडवणारे कारखानदार नाहीत का ? महाविकास आघाडीमध्ये काय सर्व साधू-संत आहेत का ? सर्वजण तसलेच आहेत. ५ एप्रिल या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर स्वाभिमानीची पुढील दिशा ठरणार आहे.