देशविरोधी कारवायांसाठी पैसे गोळा केल्याच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याला अटक !

देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना आवळल्या मुसक्या !

देशविघातक कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ? – संपादक

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) केरळच्या कोझीकोड विमानतळावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा पदाधिकारी अब्दुल रज्जाक बीपी याला अटक केली आहे. तो देशातून पलायन करण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यावर देशविरोधी कारवायांसाठी पैसे गोळा करत असल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे केरळ अध्यक्ष सी.पी. महंमद बशीर याविषयी म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी रज्जाक याला जाणीवपूर्वक अटक करून त्याला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ईडी’ची कारवाई निंदनीय आहे.