‘राष्ट्रपती पदक’ मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे असे नितीभ्रष्ट पोलीस ‘राष्ट्रपती पदक’ मिळवण्यासाठी पात्र आहेत का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.
पुणे – राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी गणेश जगताप या पोलीस कर्मचार्याने सेवा पुस्तिकेमध्ये खाडाखोड करून, तसेच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक संतोष भोसले यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २६ जुलै २०१७ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात घडला आहे.
राष्ट्रपती पदक प्राप्त करण्यासाठी सेवा कार्यकाळात कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली असू नये,अशी अट आहे. जगताप यांनी कामात कसूर केल्यामुळे त्यांची २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा त्यांना १३ फेब्रुवारी २०१८ ला देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कट रचला.