‘गुरु तोचि देव’ ऐसा ठेवी भाव ।

सौ. कोमल जोशी

‘गुरु तोचि देव’, ऐसा ठेवी भाव ।
आपत्काळी रक्षणासाठी  तेचि घेती धाव ।
अंतरात गुरूंप्रती असे कृतज्ञताभाव ।। १ ।।

गुरूंवरील श्रद्धेने करूया आपत्काळरूपी नौका पार ।
केवळ गुरुस्मरणाने होईल मनावरील हलका भार ।। २ ।।

गुरुकृपेमुळे सर्व देवताही आल्या ।
आपत्काळात साधकांच्या रक्षणकर्त्या झाल्या ।। ३ ।।

कसे फेडू गुरुराया (टीप १) आता तुमचे ऋण ।
गुरु सांगती आता निश्चिंत रहा हो साधकजन ।। ४ ।।

गुरुकृपेने हे भावविश्व अनुभवले । भावविश्वात आता गुरुदेवच सामावले ।
आपत्कालीन स्थितीमध्ये गुरुदेवच तारणहार ठरले ।। ५ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक