‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर यांच्याविषयी साधिका श्रीमती सुरेखा सरसर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. स्वीकारण्याची वृत्ती
‘शांतारामदादांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून आध्यात्मिक उन्नती करून घेतली. त्यांनी कधीच त्यांच्या घरगुती अडचणी इतरांना सांगितल्या नाहीत.
२. सेवेची तळमळ
नांदेडला साधकसंख्या अल्प आहे. अनुमाने १२ वर्षांपासून शांतारामदादा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतात. नांदेडचे तापमान उन्हाळ्यात ४५ डिग्री असते. दादा एवढ्या उन्हातही सायकलवरून सेवेसाठी जातात. ‘सर्वांना वेळेत दैनिक ‘सनातन प्रभात’ मिळावे’, अशी दादांची तळमळ असते. ते पावसात भिजत दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घरोघरी पोचवतात. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ भिजू नये’, याची ते काळजी घेतात.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
दादांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. ते काही मासांपूर्वी रामनाथी आश्रमात गेले होते. ‘तेव्हापासून त्यांच्यात पालट होत आहे’, से जाणवते. ते घरी आल्यानंतर अंतर्मुख आणि वेगळ्याच भावविश्वात असतात. त्यांची साधनाही वाढली होती. कितीही कष्ट झाले, तरी बोलून दाखवण्याची त्यांची वृत्ती नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर सगळे काही करवून घेत आहेत’, असे दादा म्हणतात.’
– श्रीमती सुरेखा सरसर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |