मणीपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू

भारतातील निवडणुका कधीतरी शांततेत पार पडतात का ? – संपादक

इम्फाळ (मणीपूर) – मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली. सेनापती येथे मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणार्‍या एका बसवर काही जणांनी आक्रमण केले. यात एकाचा मृत्यू झाला.

मणीपूरसह उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या असून उत्तरप्रदेश राज्याचा शेवटचा टप्पा शेष आहे. या पाचही राज्यांचे निकाल १० मार्च या दिवशी घोषित होणार आहेत.