उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋतुराज हरीष पिंपळे हा या पिढीतील एक आहे !
फाल्गुन शुक्ल पक्ष तृतीया (५.३.२०२२) या दिवशी कु. ऋतुराज हरीष पिंपळे याचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. ऋतुराज हरीष पिंपळे याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्म ते ६ मास
मारुतीच्या चित्राकडे पाहून खेळणे : ऋतुराजला पंचमुखी मारुतीच्या चित्रासमोर ठेवले असता तो मारुतीच्या चित्राकडे पाहून आनंदाने हात-पाय हालवून घंटोन्घंटे खेळायचा. त्या वेळी ‘तो मारुतीशी संवाद साधत आहे’, असे आम्हाला वाटायचे.
२. वय ६ मास ते १ वर्ष
२ अ. मंदिरातील मृदंग वाजवणार्या मुलांकडे पाहून त्यांच्याप्रमाणे हातांच्या बोटांच्या हालचाली करून ताल धरण्याचा प्रयत्न करणे : आम्ही काही दिवस आळंदीला होतो. आम्ही पहाटे ४ वाजता उठून संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी जायचो. तेव्हा मंदिरात काही मुले मृदंग वाजवत असत. ते पाहून ऋतुराजही त्यांच्याप्रमाणे हातांच्या बोटांच्या हालचाली करून ताल धरण्याचा प्रयत्न करत असे.
२ आ. कपाळावर गंध लावायला आवडणे : त्याचे आजोबा सकाळी देवपूजेच्या वेळी वारकरी संप्रदायाप्रमाणे गंध लावत असत. ऋतुराज आजोबांचे सर्व आवरून होईपर्यंत आजोबांजवळ मांडी घालून बसून रहात असे. मग आजोबांनी त्याला गंध लावल्यावरच तो आजोबांना आणि देवाला नमस्कार करून जात असे.
३. वय १ ते २ वर्षे
३ अ. इतरांचा विचार करणे : त्याचे आजोबा त्याला प्रतिदिन पेढा किंवा अन्य खाऊ आणत असत. ऋतुराज सर्वप्रथम तो खाऊ सर्वांना देत असे आणि शेवटी शिल्लक असेल तेवढाच खाऊ आनंदाने खात असे.
३ आ. सांगितलेले ऐकणे : ऋतुराज खेळात कितीही मग्न असला, तरीही त्याला एखादी वस्तू आणून देण्यास सांगितले, तर तो खेळ सोडून त्याच क्षणी सांगितलेले ऐकत असे.
४. वय ३ ते १० वर्षे
४ अ. बाहेरून कुणीही आले, तर तो त्यांना स्वतःहून पिण्यासाठी पाणी देत असे.
४ आ. आश्रमात जाण्यासाठी व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवणे : आम्ही त्याला सांगितले, ‘‘आपल्याला आश्रमात सेवेसाठी जायचे आहे. आपण व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवले, तर परात्पर गुरुदेव आपल्याला लवकर आश्रमात बोलावतील.’’ तेव्हापासून तो रात्री ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रात्मक जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन झोपत असे. ‘झोपतांना हा ग्रंथ घेतल्यास मला परात्पर गुरुदेव उठवतात’, असे तो म्हणत असे. तो रात्री तीन वाजता उठून नामजप करत असे.
५. स्वभावदोष
आळस, चिडचिड करणे आणि मनाने करणे’
– श्री. हरीष पिंपळे आणि सौ. मनीषा हरीष पिंपळे (ऋतुराजचे वडील आणि आई), मानवत, जिल्हा परभणी. (२२.२.२०२२)