आमच्या आत्मोन्नतीची तळमळ । आमच्यापेक्षा तुम्हालाच अधिक ।
आमच्या चुका सांगूनी । सुधारण्याचा मार्ग दाखविला, तुम्ही पू. अण्णा ।। १ ।।
साधनामार्गावर आमची मंदगती ओळखून । सेवेचे दायित्व देऊन ।
पुढचा मार्ग दाखवून । मार्गदर्शन केले, तुम्ही पू. अण्णा ।। २ ।।
व्यष्टी-समष्टी साधनापथावर । आम्हा सर्वांना गुरुचरणांपर्यंत घेऊन जात आहात ।
साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. अण्णा ।। ३ ।।
तुम्ही भाव, तळमळ, श्रद्धा । वाढवण्यास सांगितले आम्हाला ।
उदाहरणे देऊन प्रोत्साहन दिले । चैतन्याने भारित केले, तुम्ही पू. अण्णा ।। ४ ।।
काही वेळा आमचे दोष-अहं काढण्यासाठी । कठोरपणे सांगितले ।
काही वेळा प्रेमभावाने । जाणीव करून दिलीत, तुम्ही पू. अण्णा ।। ५ ।।
संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ।। ६ ।।
‘साधकांची साधना झाली पाहिजे, गुरुकार्याची वृद्धी झाली पाहिजे’, अशी तीव्र तळमळ असणारे समष्टी संत आम्हाला दिले’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. शारदा योगीश, बेंगळुरू, कर्नाटक. (२८.५.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |