सातारा, १ मार्च (वार्ता.) – फलटण तालुक्यातील काळज या गावी मद्यालयासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. काळज येथील एकाने ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा विरोध धुडकावून सरपंच आणि ग्रामसेवक यांची बनावट कागदपत्रे सिद्ध करून ती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर केली. सरपंचपदाचा कार्यकाळ संपला असला, तरी त्यांच्या कागदपत्रांचा उपयोग करण्यात आला आहे. या विषयी जिल्हाधिकारी शेखर सिंह याविषयी कोणती भूमिका घेतात याकडे काळज ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.