गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

  • हनुमान मंदिरात आश्रय घेतलेल्या गोरक्षकांवर मंदिरात घुसून आक्रमण !

  • पोलिसांकडून आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर लाठीमार !

  • तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे तेथे गोरक्षकांवर धर्मांध गातस्करांनी आक्रमण केले, तर आश्चर्य वाटू नये !
  • धर्मांध गोतस्करांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना लाठीमार करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?

भाग्यनगर – शहरात गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांध गोतस्करांनी आक्रमण केले. त्यानंतर गोरक्षकांनी आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येथील मंदिरामध्ये आश्रय घेतला असता गोतस्करांनी मंदिरात घुसून गोरक्षकांवर पुन्हा आक्रमण केले. याविषयीची माहिती सामाजिक माध्यमांद्वारे पसरल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी ‘गोतस्करांना त्वरित अटक करा’, अशी मागणी केली.

१. २२ फेब्रुवारी या दिवशी गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना ‘भाग्यनगरमधील कारमानघाट येथील मीरपेठ परिसरात गोतस्करी चालू आहे’, अशी माहिती मिळाली.

२. एका वाहनातून गायींची तस्करी होत असल्याचे कळल्यावर गोरक्षकांनी पशूवधगृहाच्या दिशेने जाणार्‍या या गाडीचा पाठलाग केला.

. गोतस्करांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या वेळी या गाडीतील धर्मांध गोतस्करांनी गोरक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण केले.

४. गोरक्षकांनी जवळ असलेल्या हनुमान मंदिरात आश्रय घेतल्यावर गोतस्करांनी मंदिरात घुसून त्यांच्यावर आक्रमण केले आणि गोरक्षकांच्या गाडीची तोडफोड केली.

५. ही माहिती मिळाल्यावर भाजप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना घटनास्थळी पोचले. त्या वेळी गोतस्कारांनी गायींना घेऊन पळ काढला. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी गोतस्करांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर लाठीमार केल्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला.

…तर आम्ही हिंसक जिहाद्यांची ‘कबर’ खोदू ! – विहिंप

भाग्यनगर – या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना विहिंपचे केंद्रीय महासचिव मिलिंद परांडे म्हणाले, ‘‘गोरक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी समर्पित असलेल्या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी हे प्रकार थांबवले नाहीत, तर हिंदु युवक रस्त्यावर उतरतील. आम्ही हिंसक जिहाद्यांची ‘कबर’ भारतामध्येच खोदू.’’