सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी साधिकेला तिच्या जवळच ‘श्रीकृष्ण’ असल्याची जाणीव करून देणे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी मला भ्रमणभाष केला होता. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. त्यांनी मला विचारले, ‘‘तुझ्याजवळ आता कोण बसले आहे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘कुणी नाही.’’ त्यानंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘श्रीकृष्ण नेहमी आपल्या जवळच असतो ना ?’’

कु. वेदिका मोदी

त्यांचे ‘श्रीकृष्ण’ असे शब्द ऐकताच मला माझ्या बाजूला असलेल्या साहित्यावर अकस्मात् हिरव्या आणि निळ्या या रंगांचे दैवी कण चमकतांना दिसले. मला श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती आली.’

– कु. वेदिका मोदी (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के) (वय १३ वर्षे), जोधपूर, राजस्थान. (७.४.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक