आपण एक पाऊल उचलल्यावर ।
देव लगेच दुसरे पाऊल टाकतो ।। १ ।।
आपल्याला देवाच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे ।
देवासारखे आपल्याला लवकर परिपूर्ण व्हायचे आहे ।। २ ।।
देव आपल्या समवेत प्रत्येक क्षणी असतो ।
देव आपली नेहमी परीक्षा बघत असतो ।
त्या परीक्षेत पास व्हायचे कि नापास व्हायचे ।
हीच आपली खरी साधना असते ।। ३ ।।
देव त्याची प्रत्येक प्रसंगातून जाणीव करून देतो ।
प्रसंगावर मात करून त्यावर ।
उपाययोजना काढणे ही साधना आहे ।। ४ ।।
देवाने आतापर्यंत जे काही साधकांच्या रक्षणासाठी केले ।
त्याचे उपकार कधीच फेडू शकत नाही ।। ५ ।।
– कु. गौरी मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |