कानपूर (उत्तरप्रदेश) – तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याला ‘तुमच्या पक्षाचा गोव्यामध्ये काहीच अस्तित्व नाही, तरी तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी का आला आहात ?’ असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर देतांना म्हटले, ‘आम्ही येथील मगोपशी युती यासाठीच केली आहे की, आम्ही गोव्यातील हिंदूची मते विभागण्याचा प्रयत्न करत आहोत.’ यातून ते कुणाचे मत गोळा करू इच्छित आहेत ? अशा प्रकारचे राजकारण गाडले गेले पाहिजे. निवडणूक आयोगाने आणि भारतीय मतदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका प्रचारसभेत केले.
Goa: PM Modi balks as TMC claims ‘Allied with MGB to split Hindu vote’; urges EC to note https://t.co/WOoRjIswIQ
— Republic (@republic) February 14, 2022