निर्णय येईपर्यंत धार्मिक वेशभूषेवर बंदी !-  कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटकात मुसलमान मुलींनी महाविद्यालयात हिजाब घालून येण्यासाठी अनुमती मागितल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – याचिकांवरील सुनावणीवर अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांच्या मोठ्या खंडपिठाने दिला आहे. कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यर्थिनींना हिजाब (मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्याची अनुमती मागण्याच्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे.

‘निर्णय होईपर्यंत महाविद्यालये चालू करण्यात येऊ शकतात’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी करण्यात येणार आहे.

कर्नाटक सरकारने राज्यात ‘कर्नाटक शिक्षण कायदा १९८३च्या कलम १३३ नुसार सर्व शाळा आणि महाविद्यलये येथे गणवेश घालणे अनिवार्य केले आहे. याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.