१. नवीन वास्तूत त्रास न जाणवणे आणि ‘वास्तुदेवता आणि सभोवतालचा निसर्ग जणूकाही श्री गणेशमूर्ती अन् श्री गुरुदेव यांचा सत्संग मिळण्याची वाट पहात होते’, असे जाणवणे
‘नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही नवीन वास्तूत रहायला आल्यावर मला प्रथमच वास्तूत कुठेही अगदी तळघरातही त्रास जाणवला नाही. सर्वसाधारणपणे वास्तूत किंवा कोणत्याही घरात त्रास असेल, तर मला तो जाणवतो. (काही वेळा वास्तूमधील दाब वाढतो किंवा माझ्या मुलाचा (रुद्रचा) त्रास वाढला, तर पूर्वजांचा त्रास जाणवतो.) आम्ही ध्यानमंदिरात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि प.पू. डॉक्टर यांची छायाचित्रे, बाळकृष्ण आणि श्री अन्नपूर्णादेवी यांच्या मूर्ती; प.पू. डॉक्टरांनी आशीर्वादस्वरूप पाठवलेली श्रीराम पंचायतन प्रतिमा, श्री गुरुपादुका आणि त्याच समवेत श्री गणेशमूर्तीही ठेवली आहे. ‘ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना मन लवकर एकाग्र व्हावे’, या दृष्टीने माझ्या यजमानांनी (श्री. शैलेंद्र यांनी) ही रचना करण्यास सुचवले. ‘या वास्तूची वास्तुदेवता आणि सभोवतालचा निसर्ग जणूकाही श्री गणेशमूर्ती आणि श्री गुरुदेव यांचा सत्संग मिळण्याची वाट पहात होते’, असे मला जाणवले.
२. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) छायाचित्रात पिवळसर रंगाची छटा आली आहे’, असे दिसणे
२ अ. प.पू. बाबांचे छायाचित्र सजीव दिसून ‘ते प्रत्यक्ष समोर आहेत’, असे जाणवणे : ‘१३.६.२०२० या दिवशी मी घरातील ध्यानमंदिरात गेल्यावर तेथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) छायाचित्राला पिवळसर छटा आली आहे’, असे मला जाणवले. या छायाचित्रातील प.पू. बाबांच्या सदर्याच्या उजव्या बाहीचा भाग, त्यांच्या डोक्याभोवतीची प्रभावळ आणि आसंदीवर टेकलेल्या त्यांच्या डाव्या हाताच्या सदर्याच्या बाहीचा भाग, या ठिकाणी ही छटा अधिक गडद दिसते. हे पाहून माझी भावजागृती झाली. प.पू. बाबांचे छायाचित्र सजीव दिसून ‘ते प्रत्यक्ष माझ्यासमोर आहेत’, असेच मला वाटत होते.
– सौ. मृृणाल नानिवडेकर, अमेरिका (२७.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |