उडुपी (कर्नाटक) येथील सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घातले !

शाळा, महाविद्यालये यांचे गणवेश असतांना ते नाकारून धार्मिक वेशभूषा करण्याची धर्मांधांची मागणी नियमबाह्य आहे, त्यावर जर हिंदु विद्यार्थी प्रतिक्रिया म्हणून भगवे उपरणे घालत असतील, तर ते चुकीचे कसे म्हणता येईल ?

छायाचित्र सौजन्य : twitter

उडुपी (कर्नाटक) – येथील कुंडापूरच्या सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींना वर्गामध्ये हिजाब घालण्यास अनुमती नाकारल्याने त्यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या महाविद्यालयातील १०० हून अधिक हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालत महाविद्यालयात प्रवेश केला. ‘जर मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालण्याची अनुमती मागत असतील, तर आम्हीही भगवे उपरणे घालून का येऊ शकत नाही ? जोपर्यंत महाविद्यालयात हिजाबला बंदी घातली जात नाही, तोपर्यंत आम्ही भगवे उपरणे घालून येऊ’, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, जर गणवेश नाकारून हिजाब घालण्याचा हट्ट करण्यात येत असेल, तर ही आतंकवादी मानसिकता आहे. अशा विद्यार्थिनींना महाविद्यालयातून काढून टाकले पाहिजे.