सूर्यनमस्कार योग असून धार्मिक उपासना नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात सूर्यनमस्कारच्या विरोधात याचिका प्रविष्ट केल्याचे प्रकरण !

धर्मांध कधीही योग यासारखा हिंदूंचा सांस्कृतिक वारसा किंवा परंपरा यांचा धर्माच्या नावाखाली स्वीकार करत नाहीत. याउलट बरेच जन्महिंदू मात्र सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दर्ग्याला भेट देणे, रोजे पाळणे यांसारख्या कृती करतात, हे लज्जास्पद ! – संपादक

डावीकडे काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व सरकारी शिक्षण संस्थांमध्ये आयोजित होणार्‍या सूर्यनमस्कार कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी येथील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने म्हटले, ‘सूर्यनमस्कार योग आहे, ती धार्मिक उपासना नाही. सूर्यनमस्कार आरोग्य आणि जीवन यांची आवश्यकता आहे.’ ‘सूर्यनमस्कारामुळे अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात’, हे मसूद यांचे सूत्र न्यायालयाने या वेळी फेटाळले.

१. मसूद यांनी याचिकेत म्हटले होते की, सूर्यनमस्काराला सूर्याची पूजा म्हटले जाते. सूर्याची पूजा करणे इस्लामच्या विरोधात आहे. राज्यघटना आपल्याला सरकारी शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे शिक्षण किंवा त्यावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यास अनुमती देत नाही.

२. यावर न्यायालयाने म्हटले की, सूर्यनमस्कार करण्यासाठी कुणालाही बाध्य करण्यात येत नाही. जर असे कुठे आदेशात म्हटले असेल, तर तुम्ही दाखवू शकता.