सनातन संस्थेत निष्काम भावाने सेवा करत असूनही त्यावर सहकार्यांचा विश्वास न बसणे
‘मी पोलीस विभागामध्ये नोकरी करत असतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो. त्यामुळे मी ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी साहाय्य करणे आदी सेवा करायचो. ‘यातून मला पैसे मिळत असतील’, असे माझ्या सर्व सहकार्यांना वाटायचे. त्यांना वाटायचे की, आजच्या काळात कोण आपला वेळ आणि पेट्रोलसाठी पैसे वाया घालवणार आहे ! मी घरात काही वस्तू घेतली, तर ‘त्यासाठी मला सनातन संस्थेने साहाय्य केले असणार’, असा त्यांचा अपसमज व्हायचा. याविषयी मी त्यांना अनेक वेळा सांगितले, ‘सनातन संस्था कुणाला अशा प्रकारे पैसे देत नाही. ज्यांना हिंदु धर्माविषयी प्रेम आहे आणि ज्यांना हिंदु धर्मासाठी निःस्वार्थपणे तन, मन अन् धन यांचा त्याग, तसेच सेवा करायची आहे, त्यांनाच सनातन संस्थेमध्ये स्थान आहे.’ – एक पोलीस कर्मचारी
(क्रमश:)