पंजाबमधील एका न्यायालयात एका माजी पोलीस कर्मचार्याद्वारे बाँबस्फोट घडवला जातो, सीमावर्ती क्षेत्रात आर्.डी.एक्स्.ने भरलेली बस सापडते, पाकमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ पंजाबमध्ये पाठवली जात आहेत, हे सर्व पहाता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना समवेत घेतले आहे. देशाच्या विरोधात शत्रूराष्ट्राने छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ केले आहे; मात्र ते या युद्धात कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे. पंजाब सरकारने जागृत होऊन राज्य आणि सीमावर्ती भाग सुरक्षित ठेवला पाहिजे.