रेल्वेच्या भरती परीक्षांविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

देशात रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत असल्याचा दावा

नवी देहली – बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून या सूत्रावर केंद्र सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, ‘आता मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करण्याचा विचार करत आहे’, अशी चर्चा जाणूनबुजून पसरवली जात आहे किंवा ती केली जात आहे. याचा संबंध राज्यांमधील रेल्वे भरती परीक्षा वारंवार रहित करण्याशी जोडला जात आहे. सरकारने सतर्क होऊन यासंदर्भात आताच त्याची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा तरुणांचा उद्रेक होईल.