श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या श्री राजमातंगी यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण !

राजमातंगी देवी

‘१४.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री राजमातंगी यज्ञ’ झाला. या यज्ञाला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती. देवाने माझ्याकडून या यज्ञाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा करवून घेतली. मला या यज्ञामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री राजमातंगीदेवीच्या यज्ञातील हविष्याची (आहुती देण्यासाठीच्या वस्तूंची) आध्यात्मिक वैशिष्ट्ये

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी नेसलेल्या साड्यांच्या माध्यमातून प्रक्षेपित झालेल्या देवीतत्त्वाचा लाभ विविध योनींतील सात्त्विक जिवांना होणे

यज्ञाच्या वेळी देवीलोकातून पृथ्वीवरील यज्ञकुंडाकडे येणारे श्री राजमातंगीदेवीचे सूक्ष्मतम तत्त्व धारण करण्यासाठी सात्त्विक जिवांची पातळी किमान ७० टक्के असणे आवश्यक होते. सर्वसामान्य ३० ते ६० टक्के पातळी असणार्‍या सात्त्विक मनुष्यांना आणि इतर योनींतील सात्त्विक जिवांना देवीचे सूक्ष्मतम तत्त्व ग्रहण करता येत नाही, तर त्यांना केवळ सूक्ष्म स्तरावरील तत्त्व ग्रहण करता येते. यज्ञाच्या वेळी महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सद्गुरुद्वयींनी परिधान केलेल्या पोपटी रंगाच्या रेशमी साडीमध्ये श्री राजमातंगी देवीचे तत्त्व आकृष्ट होऊन ते सूक्ष्म स्तरावर पृथ्वीच्या वायुमंडलात प्रक्षेपित झाले होते. त्यामुळे श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व पृथ्वीवरील विविध देशांमध्ये वास करणार्‍या विविध सात्त्विक जिवांना सहजरित्या ग्रहण करता आले. त्यामुळे विश्वातील सात्त्विक जिवांवरील त्रासदायक रज-तम प्रधान काळ्या शक्तीचे आवरण न्यून होऊन त्यांना देवीचे चैतन्यदायी तत्त्व मिळून आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. यावरून आपल्या लक्षात येते की, महर्षि समष्टीला, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील विविध ठिकाणी निवास करणार्‍या केवळ मनुष्यालाच नव्हे, तर विविध योनीतील सात्त्विक जिवांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यासाठी देवीस्वरूप असणार्‍या सद्गुरुद्वयींना विशिष्ट रंगाची रेशमी किंवा सुती वस्त्राची साडी नेसण्यास सांगतात. यावरून महर्षींची सर्वज्ञता, सर्व प्राणीमात्रांप्रतीची प्रीती, व्यापकता आणि दूरदर्शीपणा या गुणांचे दर्शन झाले.

३. श्री राजमातंगी यज्ञ करत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये कार्यरत झालेले त्रिदेवींचे तत्त्व

४. श्री राजमातंगीदेवीच्या यज्ञाअंतर्गत झालेल्या विधींमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

४ अ. यज्ञात हीना अत्तराची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम : ‘हीना’ अत्तरामध्ये श्री महालक्ष्मीदेवीची तारक शक्ती कार्यरत असते. यज्ञात हीना अत्तराची आहुती दिल्यामुळे अत्तरातील आपमय घटकांचे विघटन होऊन त्याचे रूपांतर सुगंधमय धुरामध्ये झाले. सुगंधामध्ये प्राणशक्तीच्या गंधमय लहरी आणि धुरामध्ये प्राणशक्तीचे मूळ वायूरूप कार्यरत होते. त्यामुळे ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर यज्ञातून येणारा सुगंधमय धूर श्वासातून साधकांच्या देहात गेल्यावर चैतन्यदायी सुगंधमय वायूलहरींमुळे त्यांच्या श्वसनमार्गातील अडथळे दूर झाले आणि त्यांची प्राणशक्ती वाढण्यास साहाय्य झाले. अशा प्रकारे श्वसनमार्गातून देहामध्ये प्रविष्ट होणार्‍या विषाणूंच्या आक्रमणांपासून साधकांचे रक्षण झाले.

कु. मधुरा भोसले

४ आ. यज्ञात गुग्गुळ धुपाची आहुती दिल्यावर दत्ततत्त्व आणि देवीतत्त्व कार्यरत होणे : गुग्गुळामध्ये देवी आणि दत्त यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. श्री राजमातंगीदेवीच्या यज्ञाच्या वेळी जेव्हा यज्ञात गुग्गुळ धुपाची आहुती दिली, तेव्हा गुग्गुळाच्या सुगंधातून वातावरणात दत्ततत्त्वाच्या गंधलहरी प्रक्षेपित झाल्यामुळे साधकांच्या सूक्ष्म कोशांची शुद्धी होऊन त्यांची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता वाढली. यज्ञातील गुग्गुळ धुपाच्या सात्त्विक धुराकडे वातावरणातील रज-तम प्रधान त्रासदायक शक्तीच्या लहरी आकृष्ट झाल्या आणि गुग्गुळातील देवीतत्त्वामुळे या त्रासदायक शक्तींचे विघटन झाले. त्यानंतर रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरात साधकांना सूक्ष्मातून विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास देणार्‍या प्रेतयोनीत अडकलेले ३ त्रासदायक लिंगदेह यज्ञकुंडातील ज्वाळेकडे खेचले गेले. यज्ञज्वाळेत प्रकट झालेल्या श्री राजमातंगीदेवीच्या मारक शक्तीमुळे या लिंगदेहांचे विघटन झाले. तेव्हा स्थुलातून यज्ञकुंडातून पुष्कळ प्रमाणात काळ्या रंगाच्या धुराचे लोट बाहेर पडत होते आणि यज्ञकुंडातील अग्नीज्वाळांकडे पहातांना ‘त्या पेटलेल्या चितेच्या ज्वाळेप्रमाणे उग्र आहेत’, असे वाटत होते. यावरून ‘सूक्ष्मातून घडणार्‍या घटनेचे स्थुलातूनही कसे पडसाद दिसून येतात’, हे सूत्र शिकायला मिळाले.

४ इ. लघुपूर्णाहुतीच्या वेळी श्री राजमातंगीदेवी सद्गुरुद्वयींची समष्टी कल्याणाची तळमळ आणि समष्टीभक्ती पाहून त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होणे अन् तिने ‘संपूर्ण पृथ्वीवर प्रथम सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून ‘रामराज्य’, म्हणजे ‘धर्मराज्य’ किंवा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणार आहे’, असा शुभाशीर्वाद देणे : संपूर्ण यज्ञामध्ये श्री राजमातंगीदेवीचे रूप उत्तरोत्तर उग्र झाले आणि देवीचे पाताळातील अनिष्ट शक्तींशी घनघोर युद्ध झाले. जेव्हा प्रधान यज्ञ समाप्त झाला, तेव्हा अत्यंत भक्तीभावाने यज्ञात तुपाची लघुपूर्णाहुती देण्यात आली. अत्यंत भक्तीभावाने दिलेल्या आज्याहुतीमुळे (तुपाच्या आहुतीमुळे) यज्ञात सूक्ष्मातून प्रकट झालेले श्री राजमातंगीदेवीचे उग्ररूप शांत झाले. सद्गुरुद्वयींची समष्टी कल्याणाची तळमळ आणि समष्टीभक्ती पाहून श्री राजमातंगीदेवी त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाली अन् तिने सर्व साधकांना ‘लवकरच संपूर्ण पृथ्वीवर प्रथम सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून ‘रामराज्य’, म्हणजे ‘धर्मराज्य’ किंवा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल’, असा शुभाशीर्वाद दिला.

कृतज्ञताभावाने नमन : ‘विश्वगुरु असणारे विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्री राजमातंगीदेवीच्या यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण करता आले आणि त्यातून शिकता आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने नमन करते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातनू मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक