चारुयसी (गुजरात) येथील निवासी सोसायटीमध्ये मशीद उभारून करण्यात येत आहे नमाजपठण !

सूरतमध्ये ‘लँड जिहाद !’

‘शिवशक्ती सोसायटी’मधील एका इमारतीमध्ये नमाजपठण

सूरत (गुजरात) – सूरतचे काँग्रेसचे नगरसेवक अस्लम सायकलवाला यांनी फेसबूक पोस्टद्वारे ‘शिवशक्ती सोसायटी’मधील एका इमारतीमध्ये नमाजपठण होत असून ती वक्फ बोर्डाची संपत्ती असल्यामुळे ती मशीद आहे’, असा दावा केला आहे. नमाजपठण करण्यात येत असलेली ही इमारत सूरतमधील चारुयसी तालुक्यातील कंथा भागात हजीराजवळ आहे.

१. ‘त्या इमारतीत मशीद असल्यामुळे मुसलमानांसाठी ते पवित्र स्थळ आहे. कोरोना नियमांमुळे मुसलमानांना या ठिकाणी नमाजपठण करण्याची अनुमती मिळेल, अशी इच्छापूर पोलीस ठाण्यामध्ये सहमती झाली होती’, असा दावा अस्लम यांनी केला आहे.

२. आता या परिसरातील सर्व मुसलमान या ठिकाणी नमाजपठण करतात. या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक आणि उपपोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यात मुसलमान नेत्यांसह मोरा गावातील काही प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते.

वक्फ बोर्ड अवैधपणे सरकारी, अर्धसरकारी आणि खासगी संपत्ती कह्यात घेत आहे ! – ‘एकता एज लक्ष्य’, सामाजिक संस्था

जानेवारी २०२२ च्या प्रारंभी गांधीनगर येथील ‘एकता एज लक्ष्य’या संस्थेने ३३ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि प्रमुख यांना एक पत्र लिहून वक्फ बोर्ड विसर्जित करण्याची विनंती केली आहे. या पत्रात म्हटले आहे की,

१. संस्थेनुसार वक्फ बोर्ड अवैधपणे सरकारी, अर्धसरकारी आणि खासगी संपत्ती त्यांच्या कह्यात घेत आहे. (जे एका सामाजिक संस्थेच्या लक्षात येते, ते पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्या लक्षात का येत नाही ? प्रशासन झोपा काढत आहे का ? – संपादक) यासाठी ‘वक्फ अ‍ॅक्ट १९९५’ च्या नियम-कायद्यांचे उल्लंघन करण्यात येते. या कायद्यामध्ये केवळ एकाच समुदायासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे भारतीय राज्यघटनेच्या सर्वधर्मसमभाव या विचारसरणीच्या विरोधात आहे.

२. जुलै २०२० पर्यंत वक्फ बोर्डाजवळ ६ लाख ५९ सहस्र ८७७ एवढ्या अचल संपत्ती असून त्यांचे क्षेत्रफळ ८ लाख हेक्टर आहे आणि त्यावर वक्फ बोर्डाची नोंदणी आहे. हे देशव्यापी षड्यंत्र आहे. त्यामुळे असे भेदभाव असणारे नियम-कायदे पालटले पाहिजेत. सूरत आणि त्या परिसरातील ग्रामीण भागातील संपत्ती मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्डाला हस्तांतरित करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

३. ‘वक्फ’चा अर्थ आहे की, कोणत्याही मुसलमानाने त्याची संपत्ती इस्लामी कार्यासाठी दान करणे आणि हे इस्लामी कायद्यानुसार पुण्याचे काम समजले जाते. ही एक प्रकारची ‘इस्लामी चॅरिटी’ आहे. त्यानुसार बोर्डासह नोंदवलेली संपत्ती ‘वक्फ’ (दान) होते. याचप्रमाणे ‘शिवशक्ती सोसायटी’चे काही भूखंड मुसलमानांना विकण्यात आले होते. त्यातील एका भूखंडावर बांधकाम करण्यात आले होते आणि तेथेच नमाजपठण होत आहे.

४. वर्ष २०२० मध्ये पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी एका मुसलमान व्यक्तीने त्याची संपत्ती वक्फच्या नावे केली होती. त्या ठिकाणी मशीद किंवा मदरसा यांच्या रूपात नोंदणी करून तेथे नमाजपठण होऊ लागले. कुणीही त्याची संपत्ती ‘वक्फ’ची असल्याची सांगून तिला अशा पद्धतीने नोंदणी करू शकतो. त्याला शेजारी काहीही करू शकत नाही.

५. एका कायदेतज्ञाने एका वृत्तसंकेतस्थला सांगितले की, वक्फमध्ये संपत्तीची नोंदणी करण्यासाठी कुणाच्याही अनुमतीची आवश्यकता नसते. हा एकतर्फी निर्णय असतो. सामान्यत: तुम्हाला तुमची संपत्ती हस्तांतरित करायची असेल, तर सोसायटीचा अध्यक्ष किंवा समितीची अनुमती आवश्यक असते; पण उद्या तुमच्या मुसलमान शेजार्‍याने त्याच्या घराची वक्फशी नोंदणी केली आणि त्याला मशीद घोषित केली, तर तुम्ही काहीच करू शकत नाही.