१. ‘सनातन मुलांना पळवून नेते’, असे म्हणणार्या पत्रकार स्नेह्याला साधिकेने परखडपणे सत्य सांगणे
‘एक दिवस आमचे एक पत्रकार मित्र (स्नेही) आमच्या घरी आले. ते म्हणाले, ‘‘सांगलीमध्ये मला एक पालक येऊन भेटले. त्यांनी सांगितले, ‘‘सनातन मुलांना पळवून नेते.’’ त्या पत्रकार स्नेह्याचे हे बोलणे मला पटले नाही. मी त्यांना म्हणाले, ‘‘त्या मुलांचे वय काय आहे ? २ वर्षे आहे कि ५ वर्षे ? १५ वर्षांवरील मुले सनातनमध्ये जात असतील, तर त्या आई-वडिलांना सांगा की, तुमच्या ७ जन्मांची पुण्याई म्हणून तुमच्या पोटी अशा मुलांनी जन्म घेतला. तुम्ही केवळ ८ दिवस सनातनच्या आश्रमात राहून तेथे सेवा करा. नंतर ‘आश्रमात राहून काय वाटते ?’, ते सांगा. तुमची मुले चांगल्या ठिकाणी काम करतात. त्यांचे हे नशीब आहे की, ती कुठल्या वाईट मार्गाला लागली नाहीत.’’
२. आश्रमातील सेवाभावी वृत्तीचे उच्चशिक्षित तरुण पाहून पत्रकारांना आश्चर्य वाटणे आणि स्वतःला माणसे मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवणे
नंतर ते पत्रकार आश्रमात आले. त्यांनी पूर्ण आश्रम पाहिला आणि म्हणाले, ‘‘मी किती वर्षांपासून प्रयत्न करत आहे; पण मला माणसे मिळत नाहीत. येथे मात्र उच्चशिक्षित तरुण विनामूल्य कार्य करतात. हे कसे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘हे देवाचे कार्य आहे; म्हणून असे सर्व चालू आहे. तुम्ही जे करत आहात, ते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी करत आहात.’’
– एक साधिका (वर्ष २०१८)
‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे.’- श्री. संजय शर्मा, राष्ट्रीय समन्वयक, ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन, नवी मुंबई.