प्रत्येक शाळेत परिपत्रक काढून शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास सांगू ! – महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षण विभाग, सांगली

  • ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

  • हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनानिमित्त मोहीम

सांगली येथे माध्यमिक शिक्षण विभागात निवेदन स्वीकारतांना उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे (डावीकडे) यांना निवेदन देतांना सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने

सांगली, १९ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रध्वजाच्या विषयाच्या संदर्भात प्रत्येक शाळेत परिपत्रक काढून सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास सांगू, असे आश्वासन जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाच्या अंतर्गत त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले. याच मागणीचे निवेदन अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. स्मिता माईणकर उपस्थित होत्या.

सांगली येथे अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. स्मिता माईणकर

कोल्हापूर जिल्हा

१. गडहिंग्लज येथे नगर परिषद मुख्याधिकारी नागेंद्र अनंत मुतकेकर, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. विद्या चौगले-पोवार, तसेच पोलीस उपअधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे नगर परिषद मुख्याधिकारी नागेंद्र अनंत मुतकेकर (डावीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे शिक्षण विस्तार अधिकारी सौ. विद्या चौगले-पोवार यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जनार्दन देसाई, श्री. वामन बिलावर, सौ. सुधा बिलावर, श्री. सिद्राम कब्बुरे, श्री. वासू बिलावर आणि श्री. सुजल किसन बिलावर उपस्थित होते.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात निवेदन देतांना शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, तसेच अन्य

२. गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार बजरंग हेबाळकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी शिवसेनेचे गांधीनगर शहरप्रमुख श्री. दिलीप सावंत, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आढळल्यास कारवाई करू ! – विकास जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पलूस

पलूस (जिल्हा सांगली) येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. शशिकांत जोशी, तसेच अन्य
पलूस (जिल्हा सांगली) येथे तहसीलदार निवास ढाणे (डावीकडे) निवेदन देतांना श्री. शशिकांत जोशी, तसेच अन्य

पलूस येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि पलूस तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर विकास जाधव यांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन दिले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गणेश बुचडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. पांडुरंग म्हेत्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव खोत, श्री. शशिकांत जोशी उपस्थित होते.