श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अकस्मात् दर्शन होणे आणि त्या वेळी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

डावीकडून सौ. जानकीदेवी, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सौ. तेजस्वी चि. बलरामसह आणि श्री. प्रसन्ना

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भ्रमणभाषवर मुलगा चि. बलरामचे नामकरण केल्याने त्यांना भेटण्याची इच्छा होणे

‘आमच्या मुलाच्या जन्मानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीच भ्रमणभाषवरून त्याचे ‘बलराम’ असे नामकरण केले होते; परंतु बाळाच्या जन्मानंतर साडेतीन वर्षांमध्ये आम्हाला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते. माझ्या मनात अनेक वेळा ‘बलरामचे नामकरण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केले आहे, तर त्यांचे दर्शन व्हायला पाहिजे’, असे विचार यायचे; परंतु आम्हाला त्यांना भेटण्याची कधी संधीच मिळाली नाही.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. साडेतीन वर्षांनी त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची संधी मिळाल्याने पुष्कळ आनंद होणे

मार्च २०२१ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आंध्रप्रदेशमध्ये आल्या होत्या. आम्ही सहपरिवार चिराला येथे (सौ. तेजस्वीची आजी श्रीमती आरवल्ली आंडाल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)) यांच्या घरी गेलो होतो. चिरालाहून भाग्यनगर येथे परत येण्यापूर्वी एक दिवस आधी श्री. विनायक शानभाग यांचा आम्हाला संदेश आला की, ‘आम्ही (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह) विजयवाड्याहून चेन्नई येथे जात आहोत. तुम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना मार्गात भेटू शकता.’ हा संदेश वाचून आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि आम्ही त्वरित जाण्याची सिद्धता केली. ‘प्रार्थना अशा प्रकारे पूर्ण होईल’, अशी कधी आम्ही कल्पनाही केली नव्हती.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल मार्गदर्शन आणि प्रीतीचा वर्षाव यांत चिंब भिजणे

चिरालाहून भाग्यनगरला जाण्याच्या मार्गात चिलकलूरिपेटा नामक एक छोटेसे नगर आहे. त्यांनी तेथील बसस्थानकाजवळ आम्हाला थांबायला सांगितले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला (मी, तेजस्वी, बलराम आणि तेजस्वीची आई सौ. जानकीदेवी यांना) तेथेच एका वृक्षाखाली प्रत्यक्ष दर्शन दिले. त्या ४० मिनिटांच्या कालावधीमध्ये श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकूंनी आम्हाला ‘साधना आणि आपत्काळ’ या संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले, प्रसाद दिला आणि पुनः भेटण्याचे आश्वासनही दिले. जणू ती ४० मिनिटे काळ थांबला होता आणि त्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्यावर प्रीतीचा वर्षाव करत होत्या.

४. आपत्काळाविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

४ अ. आपत्काळ हा साधकांसाठी संपत्काळ असणे : आपत्काळ आम्हा साधकांसाठी नाही. बाहेर जे पापी लोक आहेत, त्यांच्यासाठी हा आपत्काळ आहे. साधकांसाठी हा साधनेच्या दृष्टीने संपत्काळच आहे. सर्व साधक ईश्वराचे लाडके आहेत. त्यामुळे साधकांना आपत्काळाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही.

४ आ. काळानुसार निर्णय घ्यावे लागणे : संसारात राहून आपण साधना करतांना सर्व गोष्टी आपल्या इच्छा किंवा अपेक्षा यांनुसार होत नाहीत. काळानुसार जशी परिस्थिती येते, तसेच निर्णय आपल्याला घ्यावे लागतात.

४ इ. प्रत्येक साधकाचे कार्य वेगळे असून त्याची जेथे साधना होणार आहे, तेथेच देव त्याला ठेवणार असणे : आम्हाला ‘आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटत होते; परंतु कोरोना आणि अन्य परिस्थिती यांमुळे तसे होऊ शकले नाही. याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘प्रत्येक साधकाचे कार्य वेगवेगळे आहे. त्यानुसार त्याने जेथे राहून साधना करायला पाहिजे, तेथेच ईश्वर त्याला ठेवतो.’’

४ ई. मन ईश्वरचरणी ठेवणे : आपत्काळाच्या दृष्टीने आपण केवळ आपल्या घराचे स्थलांतर करायचे. आपले मन ईश्वराच्या चरणीच ठेवायचे आहे. त्याचे स्थलांतर करायचे नाही.

४ उ. प्रल्हादाच्या अगाध भक्तीचा प्रसंग सांगून भक्तीविषयी मार्गदर्शन करून आश्वस्त करणे : नरसिंह अवतारात श्रीविष्णु प्रल्हादाला म्हणतो, ‘‘तू तुझ्या पित्याच्या वधाचे कारण झाला आहेस. त्यामुळे आता मी तुला नरकात पाठवतो.’’ ते ऐकून प्रल्हाद म्हणतो, ‘‘हे प्रभु, आपणच मला नरकात पाठवत आहात. मी नरकातही श्रीहरिचाच नामजप करीन. त्यामुळे नरकही स्वर्ग होऊन जाईल. मी हसतहसत नरकात जाऊ शकतो.’’ हा प्रसंग सांगून श्रीचित्‌‌शक्ति गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘८ वर्षांच्या मुलाची (प्रल्हादची) ईश्वरावर एवढी श्रद्धा आहे. आपल्याला सर्वकाही ठाऊक आहे. त्यामुळे आपण आपत्काळाला घाबरण्याची आवश्यकता नाही.’’

५. अनुभूती

५ अ. सौ. तेजस्वीच्या एका नातेवाइकांची प्रकृती गंभीर असणे; मात्र त्यांनी करून दिलेला गोड खाऊ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी खाल्ल्यावर त्या नातेवाइकांची प्रकृती सुधारणे : चिरालामध्ये रहाणार्‍या सौ. तेजस्वीच्या एका नातेवाइकांची प्रकृती फार गंभीर होती. आधुनिक वैद्यांनीही सांगितले, ‘‘ते आता फार काळ जिवंत रहाणार नाहीत.’’ चिरालाहून भाग्यनगरला येण्यापूर्वी त्यांनी सौ. तेजस्वीला एक विशेष गोड पदार्थ बनवून दिला होता. तो पदार्थ आम्ही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनाही दिला. त्यांना तो खाद्यपदार्थ पुष्कळ आवडला. त्यांनी तो पदार्थ खाल्ल्यानंतर सौ. तेजस्वीच्या त्या रुग्णाईत नातेवाइकांच्या आरोग्यात पुष्कळ सुधारणा झाली. जणू त्यांना नवीन जीवनच लाभले.’

– श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापूर, भाग्यनगर, तेलंगाणा. (२८.३.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक