आपकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित

आपचे संयोजक अरविंद केजरावाल (डावीकडे) व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अभिनेते भगवंत मान सिंह (उजवीकडे)

पंजाब – फेब्रुवारी मासात पंजाब राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाने अभिनेते भगवंत मान सिंह यांचे नाव घोषित केले आहे. ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोहाली येथील सभेत केली. मान यांनी यापूर्वी दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती.