राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १६.१.२०२२

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

युद्धात इंग्रजांच्या बाजूने रहाणारे आणि त्यांचे मित्र असलेले मोहनदास गांधी

मोहनदास गांधी

दक्षिण आफ्रिकेत तर गांधींची वेशभूषा इंग्रजी, त्यांचे मित्रमंडळ इंग्रजांचे, त्यांचे चहाते इंग्रज, असा सारा इंग्रजी थाट-माट होता. बोअर युद्धात ते इंग्रजांच्या बाजूने होते. भारतात ते १९१५ या वर्षी आले. त्या वेळी ४ वर्षे ते इंग्रजनिष्ठच होते. पहिले महायुद्ध संपले. भारतियांना ‘आता आपल्याला स्वराज्य नाही, तरी ऑस्ट्रेलियाप्रमाणे सार्वभौम दर्जा (डोमिनियन स्टेटस) मिळेल’, अशी आशा वाटत होती. त्याऐवजी त्यांना जालियनवाला बागेत ३०० ते ४०० हिंदू आणि शीख यांची हत्या पहावयास मिळाली. ती ज्याने केली, त्या सैन्य अधिकार्‍यास इंग्रजांनी मोठी रक्कम पारितोषिक म्हणून दिली. त्या हत्येने गांधी यांचे डोळे खाडकन् उघडले, तरी ते इंग्रजांचे शत्रू बनले नाहीतच. ‘मी सामान्य इंग्रजांचा मित्र आहे’, असे ते शेवटपर्यंत म्हणत.

– दादुमिया (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१५)


नेहरूंना शह देईल, असा सरदार पटेल पुन्हा निर्माण झालाच नाही !

सरदार वल्लभभाई पटेल

सरदारांची (सरदार वल्लभभाई पटेल यांची) चाल निराळी होती. जम्मू आणि लडाख येथे सहकार क्षेत्रातील ४-५ मोठे कारखाने टाकले की, आपल्याला हवे तसे लोकसंख्येचे प्रमाण करता येईल, असे त्यांचे गणित होते. नेहरूंना त्याचा वास आला आणि लगेच त्यांनी काश्मीर प्रश्न गृहखात्याकडून स्वत:च्या परराष्ट्र मंत्रालयात समाविष्ट करून घेतला. वर्ष १९५० च्या शेवटी सरदार वारले. नेहरूंनी ‘धाकट्या भावाला (शेख अब्दुल्ला यांना) दुखवायचे नाही’, असे धोरण स्वीकारले होते. मला शेख अब्दुल्लांच्या बेगमेनेच सांगितले होते, ‘‘बडा भाई हिंदोस्ताँपर राज करेगा, तो छोटा भाई काश्मीरपर राज नहीं कर सकता ?’’ छोटा भाई फारच वाईट वागू लागला. त्या वेळी अर्थात् अगदी निरुपाय झाल्यावर दादाने त्याला सरळ तमिळनाडूतील कारागृहात टाकले. नेहरूंना शह देईल, असा सरदार पटेल पुन्हा निर्माण झालाच नाही.

– दादुमिया (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१५)


कुठे स्वधर्माविषयी जागरूक असणारे धर्मांध, तर कुठे धर्माभिमानाचा अभाव असणारे हिंदू !

‘काही मासांपूर्वी कर्नाटकातील श्री भद्रकाली देवस्थान, बेंजनपदवु येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. त्याविषयीची छायाचित्रे आणि माहिती फेसबूकद्वारे प्रसारित करण्यात आली होती. ते पाहून ४ धर्मांधांनी दूरभाष करून हिंदु राष्ट्राविषयी आक्षेप घेतला. याउलट देवता आणि धर्म यांची निंदा होत असूनही हिंदू मात्र त्याला विरोध करणे सोडाच उलट त्याकडे दुर्लक्ष करतात. याचे कारण म्हणजे हिंदूंमध्ये असलेला धर्माभिमानाचा अभाव. हिंदूंनी धर्मशिक्षण घेतले, तरच त्यांच्यातील धर्माभिमान जागृत होऊन ते संघटित होतील आणि हिंदु धर्मावर आलेले संकट दूर होईल.’ – श्री. चंद्र मोगेर, कर्नाटक


न्यायालयांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असेल, तर सरकार हवे कशाला ?

‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (जमीन खरेदी- विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय बनले आहे. लोकांचे प्राण संकटात टाकून रुग्णालयांची भरभराट होऊ देण्यास आम्ही अनुमती देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयानेखासगी रुग्णालयांना फटकारले.’