भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे ट्वीट
बीड – ‘जिल्ह्यात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी बंदुकीची (रिव्हॉल्वरची) मागणी केली, किती दुर्दैवी ! देयकासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत, यांची वैधानिक नोंद घ्यावी’, असे ट्वीट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
#बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी #अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली,किती दुर्दैवी!बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव,सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे यांची वैधानिक दखल घ्यावी @Dev_Fadnavis @mipravindarekar @PawarSpeaks @CMOMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 10, 2022
या समवेतच ‘वैधानिक नोंद घ्यावी’, अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टॅग केले आहे.