सनातनचे साधक करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठीच्या कार्याचा एका ज्योतिषांनी केलेला सन्मान !

‘काही दिवसांपूर्वी माझ्या बहिणीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त मी घरी गेले होते. तिथे बहिणीच्या ओळखीचे एक गृहस्थ आले होते. ते ज्योतिषी होते. त्या ज्योतिषांनी मला ‘तू काय करते ?’, असे विचारले. मी त्यांना ‘सनातनच्या आश्रमात सेवा करते’, असे सांगितले. ते त्यांना आवडले. ते म्हणाले, ‘‘आपण ज्या समाजात रहातो, त्या समाजाचे आपण देणे लागतो. समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.’’ त्यानंतर त्या ज्योतिषांनी मला शाल दिली आणि ‘ही शाल प्रसाद म्हणून ठेव’, असे सांगितले.

हा प्रसंग मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘सनातनचे साधक साधना करतात. ते इतरांपेक्षा वेगळे कार्य करतात, हे समाजातील लोकांना आवडते; म्हणून ते भेटवस्तू देऊन साधकांचा सन्मान करतात. साधकांचा असा सन्मान करून ते परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनाच सन्मानित करत असतात.’’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२१)