यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक पोलीस ठाण्यातही नाही, असेच जनतेला वाटते. जनतेने सुरक्षेसाठी कुणाकडे पहायचे ? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटेल, अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ? – संपादक
पुणे – महिला पोलीस रेखा गायकवाड यांची निखिल कंगणे या तरुणाने पोलीस ठाण्यात वाट अडवून सरकारी कामात अडथळा आणला. महिला पोलीस यांच्यासह अन्य पोलिसांना शिवीगाळ केली, तसेच आरोपीने येथील चिखली पोलीस ठाण्याच्या वाहनतळामध्ये असलेल्या वाहनांना २ जानेवारीच्या रात्री १ वाजता आग लावली. यात पोलिसांनी जप्त केलेली वाहने, तसेच तक्रारदार महिला पोलीस यांची दुचाकी अशा ४ वाहनांची हानी झाली. इतर वाहनांचे ‘कुशन’ फाडून हानी केली. वाहनतळामधील २ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ तोडले. पोलीस ठाण्याच्या खिडक्यांवर दगड मारून आरोपीने काचा फोडल्या. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.