महाड (रायगड) – विन्हेरे गावातील न्यू इंग्लिश शाळेतील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. या शाळेमधील एक विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १७ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली आहे. सर्वांना गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अँटीजेन चाचण्या पॉझिटिव्ह असल्या, तरी कुणालाही कोरोनाची लक्षण दिसून येत नाहीत.