कांजूरमार्ग येथे पोलीस पथकावर गुंडांचे आक्रमण; २ पोलीस घायाळ

सराईत गुंड शिवा शेट्टीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी नेल्या होत्या केवळ लाठ्या !

गुंडांजवळ कुठलीही शस्त्रे असू शकतात, हे ठाऊक असूनही पोलीस केवळ लाठ्या घेऊन कसे गेले ? याला पोलिसांची निष्क्रीयता म्हणायची कि निष्काळजीपणा ? पोलिसांच्या अशा कुचकामी सापळ्यांमुळे पोलिसांना ‘गुंडांना पळून जाऊ द्यायचे होते’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – शिवा शेट्टी हा गुंड कांजूरमार्ग येथील कर्वेनगर येथे येणार असल्याचे कळल्याने पोलीस पथक तिथे कारवाईसाठी गेले. पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतांनाच तो पोलिसांच्या हातून निसटला. दोन पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्या अन्य गुंड साथीदारांनी पोलिसांवर आक्रमण केले. त्यात सतीश ढवळे आणि संजय चकोर हे दोन पोलीस घायाळ झाले. त्यांच्यातील एका गुंडाला पोलिसांनी पकडले; मात्र सराईत गुंड शिवा शेट्टी आणि त्याचे अन्य साथीदार फरार झाले.

गुंडांना पकडायला जातांना पोलिसांकडे लाठ्यांखेरीज कुठलेच शस्त्र नव्हते. गुंडांनी त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले.