संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे. त्या निमित्ताने पू. शिवनगिरीकर महाराज यांचा संक्षिप्त परिचय, पू. शिवनगिरीकर महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी असलेला भाव, तसेच सनातनच्या साधकांना जाणवलेली पू. शिवनगिरीकर महाराज यांची वैशिष्ट्ये आदी सूत्रे येथे पाहूया.
पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा परिचय‘पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत आहेत. त्यांनी त्यांचे गुरु प.पू. शंकर महाराज पाथर्डीकर यांच्या आज्ञेने संभाजीनगरजवळ असलेल्या ‘वडोद कान्होबा’ येथील कानिफनाथांनी तपश्चर्या केलेल्या ठिकाणी ५ वर्षे मौनव्रत ठेवून कठोर साधना केली. या स्थानात नवनाथांपैकी एक कानिफनाथ यांनी काही वर्षे तपश्चर्या केली होती. पू. महाराज प्रत्येक मासाच्या पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी यज्ञ करतात. त्यांनी ६.९.२०१७ या दिवशी ‘सनातनच्या साधकांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण व्हावे’, यासाठी शाबरी विद्येतील मंत्रांचा उपयोग करून यज्ञ केला होता. पू. महाराज सद्गुरु कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात दर गुरुवारी, अमावास्या पौर्णिमेला आलेल्या सर्व भक्तांना नामजपाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून नामजप करवून घेतात. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर यांचा परिचयपू. शिवनगिरीकर महाराज यांच्या पत्नी सौ. वनिता शिवनगिरीकर (माई) पू. महाराज यांना परमार्थात पूर्णपणे साहाय्य करतात. पू. महाराज यांनी त्यांच्या शासकीय नोकरीच्या काळात सद्गुरूंच्या आज्ञेनुसार सुटी घेऊन ५ वर्षे मौनव्रताची साधना पूर्ण केली. तेव्हा त्यांनी विनावेतन सुटी घेतली होती. तेव्हा माईंनी पू. महाराज यांना साथ दिली. माईंनी एका आस्थापनात काम करून स्वतःच्या मुलाला ‘इंजिनीयर’ केले. त्यांनी मुलीलाही शिकवले. अशा प्रकारे माईंनी पू. महाराज यांना संपूर्ण साथ दिली आणि आजही देत आहेत. |
पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि साधक यांच्याप्रती भाव१. वर्ष २०१८ मध्ये पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी त्यांच्या मुलीचा विवाह झाल्याप्रीत्यर्थ माझ्याकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी भेटवस्तू दिल्या होत्या. महाराज मला त्या देत असतांना २ – ३ मिनिटे दैवी सुगंध दरवळत होता. २. पू. महाराज यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी मी काय करू ? मी त्यांची सेवा कशी करू शकतो ?’, असे नेहमी वाटते. ३. पू. महाराज ‘हिंदु राष्ट्र लवकर यावे’, यासाठी नियमितपणे प्रार्थना करतात. ते पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी हवन करतांनाही प्रार्थना करतात. ४. पू. महाराज यांचा ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देवीस्वरूपिणी आहेत’, असा भाव आहे. पू. महाराज यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या गुरूंचे रूप आहेत’, असेच वाटते. पू. महाराज नेहमी विचारतात, ‘‘त्यांनी माझ्यासाठी काय आदेश (सेवा सांगितली) दिला आहे ?’’ ५. सनातनचे साधक पू. महाराज यांच्याकडे गेल्यावर पू. महाराज आवर्जून भक्तांना साधकांच्या सेवाभावाविषयी सांगतात. ते भक्तांच्या समोर साधकांचे कौतुक करतात. पू. महाराज यांना सनातनच्या साधकांविषयी विशेष प्रीती आहे.’ – सौ. रिचा वर्मा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२१) |
गुरूंप्रती कृतज्ञताभाव असलेले पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !१. ‘पू. शिवनगिरीकर महाराज यांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. २. सेवकभाव : ते मंदिरात किंवा अन्य वेळीही सहजतेने वावरतात. ‘ते कुणीतरी महाराज किंवा संत आहेत’, असा मानसन्मान त्यांना कधीच अपेक्षित नाही. ते म्हणतात, ‘‘मी नाथांचा (गुरूंचा) सेवक आहे.’’ ते स्वतःचे नाव सांगतांना ‘नाथसेवक … ’ असेच सांगतात. ३. पू. महाराज यांच्यामुळे अनेक भाविक नियमित उपासनेला लागले आहेत. ते श्रद्धेने आणि भक्तीने अन्नदान अन् सेवा करत आहेत. ४. तत्त्वनिष्ठता : पू. महाराज म्हणतात, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवू नका. नाथांवर विश्वास ठेवा. तेच तुमचे कल्याण करणार आहेत.’’ ५. कृतज्ञताभाव : पू. महाराज प्रत्येक कृतीचे श्रेय नाथांना (सद्गुरु कानिफनाथ आणि त्यांचे गुरु यांना) देतात. ‘तेच सर्व करवून घेतात’, यासाठी पू. महाराज नेहमी कृतज्ञताभावात असतात.’ – सौ. रिचा वर्मा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी (३०.१२.२०२१) |
पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांनी जाणलेले सनातन संस्थेच्या कार्याचे महत्त्व !
१. भाविकांना धर्माचरणाविषयी सांगणे
‘पू. शिवनगिरीकर महाराज मंदिरात उपस्थितीत असलेल्या भाविकांना आरतीनंतर धर्माचरणाची माहिती देणारी सूत्रे सांगतात, उदा. कुंकू का लावायचे ? धर्माचरण कसे करायचे ? १ जानेवारी ‘नववर्षदिन’ साजरा करू नये इत्यादी.
२. भाविकांना ‘सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग’ यांचे महत्त्व सांगणे
पू. महाराज यांना सनातन संस्थेच्या माध्यमातून होणारे धर्मदान आणि ज्ञानदान यांचे कार्य पुष्कळ आवडते. पू. महाराज भाविकांना ‘सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग’ यांचे महत्त्व सांगून त्यांना ती भेट देतात. पू. महाराज भाविकांना ‘सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग’ विकत घ्यायला सांगतात. पू. महाराज ‘भाविकांना सात्त्विकतेचा लाभ होईल’, असे पहातात.
३. पू. महाराज दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करतात.’
– सौ. रिचा वर्मा, संभाजीनगर आणि होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी
‘पू. शिवनगिरीकर महाराज यांच्याविषयी सूत्रे लिहितांना मला दैवी सुगंध येत होता.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |