मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयी विधीमंडळात करण्यात आलेल्या ठरावाला कोणताही आधार नाही. त्या ठरावाच्या वेळी आम्हीही सभागृहात उपस्थित होतो. या ठरावाला आम्हीही मत दिले; परंतु हा ठराव निवडणूक आयोग मानणार आहे का ? आरक्षणाविषयी विधीमंडळात करण्यात आलेला ठराव इतर मागासवर्गीय समाजाला वेड्यात काढणारा आहे, असे वक्तव्य शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजासाठी असलेले २७ टक्के आरक्षण वगळून निवडणूक घेऊ नये, असा ठराव विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला आहे. त्याविषयी २८ डिसेंबर या दिवशी अंतिम आठवडा चर्चेच्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.