गिरणी कामगारांच्या घरांविषयी सरकारने निश्चित धोरण घोषित करावे ! – गोविंदराव मोहिते

मागणी का करावी लागते ?

सातारा, ३० डिसेंबर (वार्ता.) – गिरणी कामगारांच्या घरांविषयी सरकारने कधी, कुठे आणि कशी घरे देणार याविषयी निश्चित धोरण घोषित करावे, अशी मागणी ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’चे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली.

गोविंदराव मोहिते म्हणाले, ‘‘वर्ष २००८ मध्ये गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना आकारास आली. अद्यापपर्यंत केवळ १५ ते १६ सहस्र कामगारांना घरे मिळाली. अनुमाने १ लाख ७५ सहस्र गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज भरले आहेत. शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत तो हयात राहिल का ? याचा विचार करून सरकारने कालबद्ध निश्चित धोरण आखावे. मुंबईच्या वैभवात भर घालण्यासाठी गिरणी कामगारांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. म्हाडा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे कामगारांसाठीची कल्याणकारी योजना मागे राहिली आहे.