हलालच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेला वैध मार्गाने विरोध करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन

व्यापार आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली. सोलापूर येथील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना विषय सांगण्यात आला. यासंदर्भातील वृत्तांत पुढे दिला आहे.

सोलापूर – कोट्यवधी मुसलमानांनी ‘हलाल उत्पादनां’च्या मागणीचा जोर धरल्याने पुष्कळ आस्थापनांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेऊन त्याद्वारे उत्पादनांची विक्री करण्यास प्रारंभ केला. ‘उत्पादनांच्या विक्रीतून माझा कसा लाभ होईल’, एवढाच विचार हिंदु उत्पादक करतात; मात्र ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे उत्पादनांची विक्री करून माझा धर्म आणि देश यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल’, याचा विचार ते करत नाहीत. ‘हलाल अर्थव्यवस्थे’ने अल्प कालावधीतच भारताच्या अर्थव्यवस्थेहून मोठी अर्थव्यवस्था प्रस्थापित केली आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने ‘हलालचा लोगो असलेली वस्तू खरेदी करणार नाही’, असा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

येथील विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे हेही उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत प्रत्येक मुसलमान व्यक्तीला ‘हलाल शिक्का’ ठाऊक आहे; मात्र पुष्कळ हिंदूंना ‘हलाल शिक्का’ कोणता ? याविषयी कोणतीही माहिती नाही. ते सर्रास ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने खरेदी करतात. त्यामुळे प्रत्येक हिंदूपर्यंत हा विषय पोचण्यासाठी प्रयत्न करा. सर्वसामान्य हिंदू वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभा रहातो, तेव्हा सरकारला त्याचे ऐकावे लागते. त्यामुळे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित व्हावे यासाठी प्रयत्न करूया.’’

या बैठकीला जुने घरकुल येथील श्री वैष्णवमारुति देवस्थानचे अध्यक्ष श्री. भास्कर राऊळ, उपाध्यक्ष श्री. महेश कोंगारी, संस्थापक श्री. प्रभाकर कमलापुरे, खजिनदार श्री. दीपक परदेशी, सदस्य श्री. अंबादास देवसानी, श्री. श्रीपति बिनगुंडी, तसेच कर्णिकनगर येथील ‘रमाकांत गृहनिर्माण संस्थे’चे अध्यक्ष आणि उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अशोक काजळे, ‘रमाकांत गृहनिर्माण संस्थे’चे संचालक एस्.आर्. पाटील, सचिव छत्रपती रूपराव केने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘हलालचा शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नका’, असे प्रबोधन करू ! – सोलापूर येथील धर्मप्रेमींचा निर्धार

सोलापूर येथील कुमठा नाका येथील धर्मप्रेमी श्री. अविनाश मदनावाले, श्री. देविदास सत्तारवाले यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘समाजात जाऊन ‘हलालचा शिक्का’ असलेली उत्पादने खरेदी करू नका, असे प्रबोधन करू’, असे सांगितले, तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनी ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले.

म्हैसगाव (जिल्हा सोलापूर) येथील मारुति मंदिरातील बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

धर्मप्रेमींची महिला आणि पुरुष यांच्यासाठी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी !

म्हैसगाव (जिल्हा सोलापूर) येथील मारुति मंदिर येथे धर्मप्रेमी श्री. सचिन नरुटे आणि श्री. बाळासाहेब पवार यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी श्री. मनोज खाडये यांनी धर्मप्रेमींना ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. बैठकीला उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनी पुरुषांसाठी १ आणि महिलांसाठी १, असे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित केले.

‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी अन्य लोकांनाही विषय सांगून त्यांचे प्रबोधन करायला हवे ! – चंद्रकांत रमण शेट्टी, भाजपचे माजी नगरसेवक

सोलापूर येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत रमण शेट्टी यांच्याशी संपर्क झाला. या वेळी ते म्हणाले की, तुमचा वेळ पुष्कळ अनमोल आहे. ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी अन्य लोकांनाही विषय सांगून त्यांचे प्रबोधन करायला हवे. पुढच्या वेळी मी परिचयाच्या लोकांनाही बोलावीन, तुम्ही त्यांना विषय सांगा.’ चंद्रकांत शेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबातील महिलांची ओळख करून दिली. हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून महिलांची बैठक घेऊन त्यांचे ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी प्रबोधन करण्याचे निश्चित झाले.

‘हलाल जिहाद’विषयी अभ्यास करून अन्यांचे प्रबोधन करीन ! – महेश देशमुख, संचालक, लोकमंगल उद्योग समूह

सोलापूर येथील लोकमंगल उद्योग समूहाचे संचालक श्री. महेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद’ हा विषय सविस्तर सांगण्यात आला. हा विषय ऐकल्यानंतर त्यांनी स्वत: भ्रमणसंगणकावर जिज्ञासेने अधिक माहिती जाणून घेतली. ‘हलाल जिहाद’चे पसरलेले जाळे पाहून ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर शुगर मिलचे श्री. महेश देशमुख अध्यक्ष आहेत त्यांना मी हा विषय सांगीन, तसेच बिहार आणि आंध्र प्रदेशचे संचालक यांनाही हा विषय सांगून त्यांचे प्रबोधन करीन.

आस्थापनाच्या ४०० कामगारांसाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करा ! – संजय बाकळे, ‘स्पीड’ आस्थापनाचे मालक

‘स्पीड’ या विख्यात आस्थापनाचे मालक श्री. संजय बाकळे यांच्याशी ‘हलाल जिहाद’ या विषयावर सविस्तर संपर्क झाला. त्यांनी संपूर्ण विषय समजून घेतला. तसेच त्यांना धर्मशिक्षण का आवश्यक आहे ?, हे सविस्तररित्या सांगण्यात आले, त्या वेळी प्रभावित होऊन म्हणाले की, आमच्या आस्थापनाच्या ४०० कामगारांसाठीही धर्मशिक्षणवर्ग चालू करा. सुट्टीच्या वेळेतील काही वेळ ते धर्मशिक्षण वर्गासाठी देणार आहेत.

‘हलाल जिहाद’विषयी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू ! – प्रकाश पवार, ‘डीजे फॅशन’चे मालक

‘डीजे फॅशन’चे मालक श्री. प्रकाश पवार यांनी जिहादचे विविध प्रकार ऐकल्यानंतर ‘समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू’, असे सांगितले.

विशेष

१. या बैठकीमध्ये श्री. भास्कर राऊळ यांनी हलाल प्रमाणपत्र रहित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्र देण्याचे निश्चित केले.

२. श्री. अशोक काजळे यांनी हलाल प्रमाणपत्र रहित करण्यासाठी पत्र देण्याचे निश्चित केले, तसेच ते त्यांच्या परिचयाच्या लोकांना ‘हलाल जिहाद’ हा विषय सांगून समाजात प्रबोधन करत आहेत.

अवश्य पहा : ‘हलाल सर्टिफिकेशन’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या कार्यक्रमाचा video पहा…

हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

सोलापूर दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीला २८ हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल जिहाद’ या संकटाविषयी सांगितल्यावर उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला. सप्ताहातून १ दिवस सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म यांविषयी कृती आराखडा निश्चित करण्यासाठी बैठक घेण्याचे निश्चित केले.