भारताकडून ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताकडून ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी देहली – भारताने ओडिशाच्या बालासोर येथील समुद्रकिनार्‍यावर ‘अग्नी  प्राइम’ या क्षेपणास्त्राची केलेली चाचणी यशस्वी झाली आहे. भूमीवरून भूमीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १ सहस्र ते २ सहस्र किलोमीटर इतकी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू आहे.