भिवंडी येथे काळ्या जादूच्या नाशासाठी मुसलमान बाबाकडून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक !

८ लाख ८७ सहस्र रुपय उकळले

ठाणे – आजारी पती आणि मुले यांवर केलेल्या काळ्या जादूचा नाश करण्यासाठी मृतदेह आणावा लागेल, असे सांगत अमजद असद खान उपाख्य हजरत (वय ४४ वर्षे) या बाबाने ८ लाख ८७ सहस्र रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलीस या बाबाचा शोध घेत आहेत.

भिवंडी येथे हा प्रकार घडला असून तिचे पती आजारी आहेत. या माध्यमातून बाबाने त्यांच्यावर काळी जादू केली असल्याचे सांगितले. मृतदेह आणण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी त्याने ८ लाख ८७ सहस्र रुपये घेतले आणि या पैशांचा अपहार केला. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना कारावासातच डांबायला हवे !