आपण दुर्बल झालो, तर त्याचे परिणाम आपली धार्मिक स्थळे आणि मुली यांना भोगावे लागतील !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हिंदूंना सतर्क करणारे विधान

अयोध्या (उत्तरप्रदेश) – कोणत्या कारणांमुळे आपल्या पूजनीय धार्मिक स्थळांची विटंबना करण्यात आली ? जातीच्या नावावर विभागले गेलो, तर अशा अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आपण दुर्बल झालो, तर त्याचे परिणाम आपल्या धार्मिक स्थळांना भोगावे लागतील. बहिणी-मुलींना त्रास सहन करावा लागेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते श्रीरामंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रीरामजन्मभूमी आंदोलन सार्थक ध्येयाकडे वाटचाल करत आहे. आता अयोध्येत आल्यावर त्रेतायुगाची अनुभूती येते. १-२ वर्षात श्रीरामजन्मभूमी संकुल भव्य स्वरूपात येईल. हे अध्यात्म आणि धर्म यांचे सर्वांत वैभवशाली ठिकाण म्हणून विकसित होत आहे.

संपादकीय भूमिका

  • अयोध्येप्रमाणे संपूर्ण भारतच अध्यात्म आणि धर्म यांचे वैभवशाली ठिकाण म्हणून विकसित व्हायला हवा !
  • हिंदू दुर्बल होऊ नयेत, यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या धर्माचरणी शासनकर्त्यांनीच आता पुढाकार घेणे आवश्यक आहे !