बजरंग दलाची आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाकडे मागणी
मालवण – धर्मांध व्यक्ती अथवा गैरहिंदूंकडून हिंदूंच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थुंकी जिहाद (अन्नपदार्थांवर थुंकून ते ग्राहकाला देणे), लव्ह जिहाद यांसारखे प्रकार घडत आहेत, तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून देवतांची निंदानालस्ती करणे आणि अन्य धर्माची धर्मप्रसारासाठीची पुस्तके वाटणे, त्यातून हिंदु धर्मियांचा बुद्धीभेद करणे, तसेच संमोहन करून पैसे अन् वस्तू यांची चोरी करणे, असे प्रकार घडतांना दिसून येत आहेत. त्यामुळे आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या यात्रेत हिंदु यात्रेकरूंचे अशा कुप्रवृत्तीपासून रक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना आणि नियमावली घोषित करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषद अंतर्गत असलेल्या बजरंग दल संघटेनेने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाकडे केली आहे. आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीची यात्रा २२ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बजरंग दल संघटनेने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ पदाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन देत याविषयी मागणी केली आहे. या वेळी बजरंग दल संघटनेचे सर्वश्री गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, तेजस प्रसाद, स्वप्निल घाडी, मुकुंद घाडी, देवीदास भाऊ, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आंगणेवाडी येथील भराडीदेवी हे असंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अनेक हिंदु भक्त देवीच्या यात्रेसाठी गेली वर्षानुवर्षे आंगणेवाडीमध्ये येऊन देवीचा कृपाशीर्वाद घेतात आणि यात्रेत सहभागी होतात. अनेक वेळा धर्माध व्यक्तींकडून हिंदूंच्या जत्रोत्सवावर, तसेच मिरवणुकीवर दगडफेक झालेली दिसून येते. काही वेळा जत्रोत्सवांमध्ये गैरहिंदू लोकांकडून दुकाने आणि आस्थापने यांसाठी मंदिर परिसरातील अधिकाधिक भूमी बळकावली जाते. यामुळे हिंदु दुकानदारांना स्वतःच्याच धार्मिक उत्सवामध्ये अतिशय अल्प जागेत व्यवसाय थाटावा लागतो. यामुळे हिंदु दुकानदारांना आर्थिकदृष्ट्या लाभ होणे अशक्य होत आहे. सध्याच्या काळात अनेक बांगलादेशी
धर्मांध घुसखोरांनी हिंदूंच्या जत्रोत्सवांमध्ये घुसून आतंकवादी कृत्य केल्याच्या बातम्या आपण पहात आहोत, तसेच बांगलादेशी मुसलमानांकडून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशी कृती केल्याचे आढळते. त्यामुळे या जत्रोत्सवामध्ये बांगलादेशी धर्मांधांची घुसखोरी रोखण्यासाठी दुकानदारांचे आणि व्यापार्यांचे आधारकार्ड अन् अन्य ओळखपत्र पडताळून त्यांना प्रवेश देण्यात यावा.
आमची देवस्थान समितीला अशी विनंती आहे की, अशा अपकृत्य करणार्या धर्माधांकडून हिंदु धर्मियांच्या भावनांना ठेच पोचेल, अशी कोणतीही कृती घडू नये. यासाठी गैरहिंदू व्यापारी, दुकानदार आणि आस्थापने यांना याविषयी समज देण्यात यावी अन् यात्रेकरूंचे अशा कुप्रवृत्तीपासून रक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना आणि नियमावली घोषित करावी. श्री भराडीदेवी मंदिर समितीला एक हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्त नेहमीच साहाय्यकार्यास उपस्थित असतात आणि यापुढेही असतील. तरी निवेदनाचा विचार करून तशी कृती मंदिर समितीकडून करण्यात यावी.