अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद !

वणी (यवतमाळ), १२ जानेवारी (वार्ता.) – येथे ११ जानेवारी या दिवशी सायंकाळी शेकडो गायींचे शीर झुडुपातील अवैध पशूवधगृहात आढळून आले. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही शहराला लागूनच असलेल्या झुडुपात अवैध पशूवधृगह चालवण्याइतकी हिंमत धर्मांधांमध्ये निर्माण होणे हे घातक आहे ! – संपादक) तत्पूर्वी जत्रा मैदान परिसरात २ गायींचे शीर आढळून आल्याची वार्ता शहरात पसरताच हिंदुत्वनिष्ठांनी तेथे धाव घेतली आणि ‘गोहत्याप्रकरणी चौकशी करून त्वरित कारवाई करावी’, अशी मागणी पोलिसांकडे केली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याविषयी भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी शिर्डीहून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही प्रकरणांच्या अनुषंगाने कठोर कारवाईिवषयी सांगणार असल्याचे माजी आमदारांनी सांगितले.
येथे अवैध धंदेवाले आणि गुन्हेगारी वृत्ती यांत प्रचंड वाढ झाली असून गुन्हेगारांवर कुठलाही वचक उरलेला नाही.