पुणे – मकरसंक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करणार्या ५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत, तसेच त्यांच्याकडून ३६ सहस्र ८२० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. सहकारनगर, चतुःशृंगी, विश्रांतवाडी, वारजे, मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली. पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना दुखापती होतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. नायलॉन मांजा विक्री करणार्यांविरुद्ध कारवाईसाठी गुन्हे शाखेने पथके सिद्ध केली आहेत.
संपादकीय भूमिकानायलॉनच्या मांजा विक्रीवर बंदी असतांनाही त्याची विक्री कशी होते ? हे प्रशासनाचे अपयश नव्हे का ? |