संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील अमृतवाहिनी फार्मसी (औषध निर्माण) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीसाठी जादा शुल्क घेतले जात होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संगमनेर शाखेने याची नोंद घेत महाविद्यालयाला (आकारल्या जाणार्या अतिरिक्त शुल्काविषयी) निवेदन दिले. याची नोंद घेत ९ जानेवारीला महाविद्यालयाने आकारलेले जादा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले आहे.