खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेकडून चंद्रपूर येथून अटक !

पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’ फेकले होते !

चंद्रपूर – अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’ फेकणार्‍या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने चंद्रपूर येथून अटक केली. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जसप्रीत सिंह (वय २० वर्षे) असे या खलिस्तानवाद्याचे नाव आहे. सकाळी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.

जसप्रीत सिंहने २०२३ मध्ये अमृतसर येथील पोलीस चौकीवर आक्रमण केले होते. अमली पदार्थांच्या व्यवसायातही तो सक्रीय होता. पोलीस चौकीवरील आक्रमणानंतर तो पसार झाला. तेव्हापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. ६ दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने त्याला या वेळी अटक केली.

संपादकीय भूमिका

घुसखोरांप्रमाणे आता खलिस्तानवादाची पाळेमुळेही महाराष्ट्रात वाढणे धोकादायक ! खलिस्तानवाद समूळ नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करायला हवेत !