संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे पहिले बालसंत असलेले पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !

प.पू. देवबाबा

१. पू. भार्गवराम झोपत असतांना साधिकेने सांगितलेले ‘प.पू. देवबाबा भेटले’, हे वाक्य ऐकून त्यांनी ताड्कन उठून ‘मला प.पू. देवबाबांकडे घेऊन चल’, असे सांगणे

‘डिसेंबर २०१९ मध्ये आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. त्या वेळी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबाही आश्रमात आले होते. १.१२.२०१९ या दिवशी मला भोजनकक्षात प.पू. देवबाबा भेटले. ही गोष्ट मी आमच्या खोलीत जाऊन सौ. भवानीला (पू. भार्गवराम यांच्या आईला) सांगत होते. तेव्हा ती पू. भार्गवराम यांना झोपवत होती. माझे बोलणे ऐकताच पू. भार्गवराम ताड्कन उठले आणि ‘मला आत्ताच प.पू. देवबाबांकडे घेऊन चल’, असे म्हणत माझ्याकडे आले. मी त्यांना घेऊन भोजनकक्षात येईपर्यंत प.पू. देवबाबा त्यांच्या खोलीत गेले होते.

पू. भार्गवराम भरत प्रभु
श्रीमती अश्‍विनी प्रभु

२. पू. भार्गवराम यांनी प.पू. देवबाबांची गाडी पहाण्याची इच्छा व्यक्त करणे आणि त्यांच्या गाडीची आनंदाने वाट पहाणे

त्यानंतर प.पू. देवबाबांना भेटल्यावर त्यांनी पू. भार्गवराम यांना २ चॉकलेट्स दिली. पू. भार्गवराम यांनी त्यांपैकी एक चॉकलेट खाल्ले आणि उरलेले एक माझ्याकडे दिले. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘मला प.पू. देवबाबांची गाडी पहायची आहे. तिकडे घेऊन चल.’’ त्याप्रमाणे आम्ही प.पू. देवबाबांच्या गाडीची वाट पहात होतो.

३. प.पू. देवबाबा परत निघण्यासाठी गाडीत बसल्यावर पू. भार्गवराम यांनी ‘मीही येतो’, असे म्हणणे

प.पू. देवबाबा परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसल्यावर पू. भार्गवराम ‘मीही येतो. मला देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले. सामान्यतः त्यांना घरच्यांना सोडून इतरांसह जाणे आवडत नाही. त्यामुळे ते ‘मला प.पू. देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले, तेव्हा मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले. प.पू. देवबाबांनी पू. भार्गवराम यांना ‘उद्या येतो’, असे सांगितल्यावर त्यांनी प.पू. देवबाबांना जाऊ दिले.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आजी (पू. भार्गवराम यांचे वडील श्री. भरत प्रभु यांची आई), आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (१.१२.२०१९)