शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी श्री. मनोज खाडये यांचे ‘हलाल : एक समांतर अर्थव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन

हस्तपत्रके वितरण करणे, व्यापार्‍यांच्या बैठका, निवेदन देणे, तसेच विविध माध्यमांद्वारे ‘हलाल’ विषयासाठी जनजागृती करण्याचा निर्धार !

शिरोली-पुलाची (जिल्हा कोल्हापूर), १० डिसेंबर (वार्ता.) – ‘हलाल’ या विषयाची जनजागृती करण्यासाठी हस्तपत्रके मुद्रित करून ती वितरण करणे, व्यापारी-केमिस्ट यांच्यासाठी बैठकांचे आयोजन करणे, विविध संघटनांचे निवेदन केंद्र सरकारला देणे, वैयक्तिक संपर्क यांसह विविध माध्यमांद्वारे हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला. शिरोली पुलाची येथील ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ६ डिसेंबर या दिवशी विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांचे ‘हलाल : एक समांतर अर्थव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

या मार्गदर्शनासाठी २४ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, सौ. साधना गोडसे, श्री. आदित्य शास्त्री, श्री. विपुल भोपळे, सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.

१. ‘शिरोली किराणा दुकानदार असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांनी हस्तपत्रके मुद्रित करून हा विषय व्यापार्‍यांपर्यंत पोचवू, असे सांगितले.

२. ‘केमिस्ट असोसिएशन’चे श्री. राजू पाटील यांनी या विषयावर ‘एका स्वतंत्र बैठकीचे आयोजन करू’, असे सांगितले.

३. मार्गदर्शन संपल्यावर अनेकांनी वैयक्तिकरित्या भेटून ‘आम्हीही या विषयासाठी पुढाकार घेऊ’, असे सांगितले.

उपस्थित मान्यवर

भाजप किसानमोर्चा जिल्हाउपाध्यक्ष श्री. सतीश पाटील, शिवसेना ग्राहककक्ष अध्यक्ष श्री. दीपक यादव, शिरोलीचे उपसरपंच आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष श्री. सुरेश यादव, शाहू दूधसंघाचे माजी अध्यक्ष श्री. नितीन चव्हाण, भाजप शहराध्यक्ष श्री. संदीप पोर्लेकर, हातकणंगले तालुका भाजप उद्योजक आघाडी उपाध्यक्ष श्री. किरण कौंदाडे, देवस्थान समिती सदस्य श्री. उत्तम पाटील, शिरोली बजरंग दल अध्यक्ष श्री. नीलेश शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरोलीचे शहराध्यक्ष श्री. अर्जुन चौगुले, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष श्री. उत्तम पाटील, हालोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते जे.बी. पाटील, मुडशिंगे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद पवार, शिवसेना शहराध्यक्ष श्री. राजकुमार पाटील.