भारताच्या जवळ ज्ञान, परंपरा, आचार-विचार, जनसंवाद आणि शास्त्र यांसारखी अत्यंत महत्त्वपूर्ण परंपरा आहे. अनेक वर्षांपासून भारताने बिघडलेल्या स्थितीचा सामना केला आणि राजनैतिक, तसेच सामाजिक र्हासाच्या शिकारीस तो बळी पडला. ज्याचा प्रभाव सामाजिक आणि धार्मिक मूल्यांसह भारताची ज्ञानपरंपरा विद्या अन् अर्थव्यवस्थेवरही पडला; परंतु आमचा राष्ट्रीय मानस, धार्मिकता, आस्था, विश्वास, राजनीती आणि प्रशासन व्यवस्था अशा स्थितीतही लागोपाठ अक्षुण्ण बनत आहे; कारण भारतीय संस्कृतीने आम्हा करोडो भारतियांना सहस्रो वर्षांपासून एका सूत्राने बांधून ठेवले आहे. संस्कृती नेहमी जोडण्याचे काम करते. भारतीय संस्कृतीमध्ये तर हा गुण अपार आणि अथांग आहे.
१. पाश्चात्त्य आणि भारतीय समाजसत्तेतील भेद
पूर्व युरोपातील नीती राजनैतिक मानली जाते; कारण तेथे समाजाचा आधार प्रशासन आणि राजनैतिक प्रमुख रूपाने आहे. अमेरिकेच्या समाजाची रचना आणि समाजजीवन गेल्या काही वर्षांत व्यापारावर आधारीत स्थापित झाले आहे. अमेरिकन नीतीमुळे अर्थ आणि व्यापार यांची नीती निर्माण झाली आहे. अनेक भारतीय आणि विदेशी विद्वानांचे मानणे आहे की, भारताची नीती धर्म आणि ज्ञान यांच्या आधारावर सहस्रो वर्षांच्या समाजजीवन रचना केंद्रित आहे.
२. मोगल आणि इंग्रज राजवटीमुळे भारतातील महान हिंदु धर्माची झालेली हानी !
भारताच्या नीतीमध्ये मधल्या कालखंडात अनेक परिवर्तन पहाण्यास मिळाले. भारताच्या इतिहासामध्ये मोगल आल्यावर पूर्व भारताच्या समाज जीवनामध्ये अनेक परिवर्तन झालेले दिसते. याचा अर्थ असा नाही की, भारतीय समाज जीवनामध्ये अर्थसत्ता किंवा राजसत्ता शून्य अथवा नगण्य होती. ज्ञानावर आधारीत अध्यात्म होते. यामुळे अशी अपेक्षा होती की, समाजाने धर्माच्या अनुसार अर्थ संपादन करावे आणि धर्माच्या आधारावरील कामामध्ये (इच्छेमध्ये) लुप्त व्हायला हवे.
अर्थ उपार्जन आणि कामाच्या आवश्यकतेला पूर्ण करतांना राजनैतिक कार्यही धर्म अन् ज्ञान यांच्या आधारावर असावी; पण जीवनामध्ये आध्यात्मिक उत्थान हा प्रमुख उद्देश असावा. मोगल काळामध्ये पराधीन भारतामध्ये नीतीच्या परिवर्तनामध्ये अधिक पालट दिसत नाही. कदाचित हेच कारण आहे की, इस्लामला मतपरिवर्तनाची जी यशस्वीयता विश्वाच्या अन्य भागामध्ये मिळाली आहे, ती भारतामध्ये केवळ आंशिकच प्राप्त झाली; परंतु इंग्रज शासनाने योजना बनवून भारताच्या नीतीला अध्यात्म आधारीत राजनीती आणि अर्थाधारित बनवण्याचा प्रयत्न केला.
३. भारतियांनो, ज्ञान आणि धर्म आधारित समाजरचना सर्वश्रेष्ठ आहे !
प्रश्न हा आहे की, भारतीय समाजासाठी श्रेष्ठ काय आहे ? भारताची विचारसरणी कशी असली पाहिजे, ज्यामुळे अपेक्षित समाजाची स्थापना व्हावी. स्वाभाविकच आहे की, ज्ञान तसेच धर्मावर आधारीत सत्ताच सर्वश्रेष्ठ समाजरचना आहे. आज विश्वातील अनेक विकसित देश समाजजीवनाच्या आधारांच्या परिवर्तनाचा प्रयत्न करत आहेत. योग, ध्यान, समाधी आदींचा प्रसार विश्वामध्ये होणे, प्रकृतीनुसार जीवन बनवण्याचा प्रयत्न आदी सर्व ज्ञान आणि अध्यात्म आधारित जीवनरचनेच्या दिशेने पुढचे पाऊल आहे. भारताची मूळ नीतीही आध्यात्मिक आहे. त्यामुळे जवळजवळ गेल्या १ सहस्र वर्षांमध्ये भारताची नीती ही राजनीती आणि अर्थ यांच्या दिशेने वळली आहे. तिला ज्ञान आणि अध्यात्म यांच्या दिशेने कसे आणणार ?, याचे बुद्धीमान वर्गाच्या समोर आव्हान आहे.
४. अद्यापही भारतीय आत्म्यामध्ये अध्यात्म जिवंत असणे
‘ब्रिटीश इतिहासकार अर्नाेल्ड टायनबी यांनी म्हटले होते की, माणसाला माणूस म्हणून सिद्ध करणारे अध्यात्म अद्यापही भारतीय आत्म्यामध्ये जिवंत आहे. त्यामुळे विश्वाला भारताचे उदाहरण सांगणे आवश्यक आहे. मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठीचे साहाय्य आणखी कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही. एकच परम सत्य असू शकते किंवा असूही शकत नाही, ते म्हणजे मोक्षाचा एकच अंतिम मार्ग आहे. जो आपण जाणत नाही; परंतु आपण ज्याला जाणत नाही, त्या सत्याला जाणण्यासाठी तेथे एकापेक्षा अधिक दृष्टीकोन (मार्ग) आहेत. त्याचसमवेत एकापेक्षा अधिक मुक्तीचे साधनही आहेत.
यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम परिवाराच्या उच्च धर्मावलंबियांसाठी वरील भाग सांगणे कठीण आहे; परंतु हिंदूंसाठी ते स्वयंसिद्ध सत्य आहे. आपांपसात सद्भावना, सन्मान आणि सत्यावर प्रेम ही भारतीय परिवाराच्या धर्माची पारंपारिक भावना आहे. हीच भारताकडून जगासाठी भेट आहे.’ – जे. नंदकुमार
५. आध्यात्मिक चेतनेमुळेच मिळेल मार्ग !
आमची विविधता आणि बहुलता व्यक्त करण्यासाठी अन् तिला स्थापित करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक चेतनेची आवश्यकता आहे.
६. संपूर्ण जगाला वैचारिक दिशा देणारा भारत !
आपल्याला हे सत्य समजून घ्यायला हवे की, भारत भलेही रूपाने एक नाही, तरी तो सांस्कृतिक वारसेचा उत्तराधिकारी आणि एक सांस्कृतिक राष्ट्र आहे. आजच्या काळात संपूर्ण जग एका सांस्कृतिक आणि वैचारिक संकटातून जात आहे. त्याला भारतच वैचारिक दिशा देऊ शकतो; कारण हा एकच विचार असा आहे की, जो दुसर्यांना स्वीकारण्यामध्ये संकट वाटत नाही.
७. अखंड भारताचे स्वप्न सर्वप्रथम पहाणारे आचार्य चाणक्य !
राष्ट्रवादाची भावना जी संपूर्ण राष्ट्राला एका सूत्रामध्ये बांधून ठेवते. ती भावना एक राजनैतिक विषय न रहाता ‘‘वसुधैव कुटुम्बकम्’’ असे व्यावहारिक रूप आहे. जेव्हा याच्या उदयाची गोष्ट सांगितली जाते, तेव्हा म्हटले जाते की, राष्ट्रवादाचा जन्म युरोपमध्ये १९ व्या शतकामध्ये झाला होता; परंतु येथे कौतुक करण्याजोगी गोष्ट ही आहे की, याची परिकल्पना सर्वांत प्रथम ‘आचार्य चाणक्य’ यांनी केली. सर्व साम्राज्यांना जोडून एक अखंड भारताचे स्वप्न सर्वप्रथम त्यांनीच पाहिले होते.
(साभार : ‘लोकमंथन समाचार’, १२ नोव्हेंबर २०१६)