बेळगाव शहरात सलग २ दिवसांत २ मंदिरांमध्ये चोरी !

  • हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! – संपादक

  • सलग २ दिवसांमध्ये २ मंदिरांमध्ये चोरी होते आणि एका आठवड्यात २० हून अधिक चोरीच्या घटना घडतात यावरून पोलीस अस्तित्वात आहेत कि नाहीत ? असा प्रश्न पडतो. पोलिसांचा धाक गुन्हेगारांमध्ये केव्हा निर्माण होणार ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

बेळगाव – ५ डिसेंबर या दिवशी गांधीनगर येथील शांतीनाथ दिगंबर जैन वस्तीतील श्री पद्मावती आणि श्री ज्वालामालिनी या देवींच्या सोन्याच्या मूर्तींसह अन्य मूर्ती मिळून ६ लाख रुपयांच्या मूर्ती चोरण्यात आल्या. यानंतर ६ डिसेंबर या दिवशी पांगुळ गल्लीतील ऐतिहासिक अश्वत्थामा मंदिरातील ४ लाख रुपये मूल्याचा चांदीचा मुकूट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे बेळगाव शहरात सलग२ दिवसांत २ मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका आठवड्यात २० हून अधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरीचा छडा तातडीने लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.